आज शेवटी बसले ब्लॉग लिहायला. माझा पहिला ब्लॉग ..."प्रतिबिंब". नाव प्रतिबिंब यासाठी, की हा ब्लॉग माझ्या मनाचं, विचारांचं आणि पर्यायानी व्यक्तिमत्वाच प्रतिबिंब बनून राहावा. ब्लॉग लिहायला कारणं पण तशीच घडत गेली आणि शेवटी सगळं कागदावर उतरवावस वाटू लागलं (पण मी ब्लॉग मध्ये उतरवत आहे). पहिलीच पोस्ट मराठीत लिहिण्याच धाडस होत नव्हतं, कारण दहावी नंतर कधी निबंध वगैरे लिहिल्याचं पण आठवत नाही. पण आपल्या मातृभाषेशी जोडलं गेलेलं नातं एवढं घट्ट आहे ना, त्यामुळे शब्द आपोआप सुचत गेले, उलट विचारांच्याही पुढे धावले आणि साकार झालं "प्रतिबिंब"!!
काही दिवसांपूर्वी बाबा आले होते घरी साधारण एका वर्षानंतर (ते नोकरीसाठी आफ्रिका मध्ये असतात). एक महिना घर लोकांच्या येण्या-जाण्यानी, भरपूर pending कामांनी, सततच्या calls नी आणि मुख्य म्हणजे बाबांच्या घरातल्या गडबडीमुळे दुमदुमून गेलं होतं. त्यातच माझा birthday आला, आमची छोटीशीच पण एकदम छान अशी एक trip झाली, आणि गृहप्राप्तीचा योगही जुळून आला. सर्वांच्या आनंदाला उधाण आलं होतं. वाटत होतं की ही वेळ इथेच थांबावी. पण डोक्यात एक विचार कायम डोकावत होता.. क्षणिक आहे हे सगळं.. काही दिवसांचा आनंद आणि नंतर पुन्हा सर्व काही तसंच, जागच्या जागी, स्तब्ध, अचल!! बाबा जाण्याच्या दोन - तीन दिवस आधीपासूनच स्वताला समजावत होते की थोडे दिवसांनी सर्व काही नीट होणार आहे पण तरी निघायच्या वेळी पाण्यानी डबडबलेले डोळे हेच सांगत होते की ह्या नात्याची सर कशालाच येऊ शकत नाही.. कशालाच नाही!
मुलीचं आणि वडिलांचं नातंच असं आहे. त्यांच्यामधल प्रेम वेगळंच आहे. वडिलांकडून त्यात मायेचा ओलावा आहे. मुलगी लहान असताना तिला आपली "छकुली" म्हणून वाढवताना येणारी जबाबदारी आहे, थोडी मोठी झाल्यावर तिचं पाउल चुकीच्या वाटेवर जाऊ नये म्हणून असणारी दक्षता आहे, मुलीच्या काळजीमुळे वाटणारी थोडी भीती आहे, तेव्हाच आपण स्वतः जडण घडण करताना कुठे चुकत तर नाही ना अशी खातरजमा आहे, मुलीच्या यशाचं भरभरून कौतुक आणि अभिमान आहे आणि आपली स्वतःची मुलगी थोड्या दिवसांपुरतीच आपल्याजवळ राहणार अशी खंतही आहे. मुलीकडून या नात्यात वडिलांबद्दल वाटणारा दरारा आहे, घरातली सर्वात जास्त समजून घेणारी व्यक्ती म्हणून वाटणारी ओढ आहे, वडिलांच्या अपेक्षांना तंतोतंत खरे उतरण्याचे प्रयत्न आहेत आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आयुष्यभर त्यांच्या सोबतच राहायची इच्छा आहे...:)
आयुष्यात आईचं महत्व तर वेगळं मांडायची गरज नाही कारण ते सर्वध्न्यात आहे. माझ्या बाबांच्या व्यक्तिमत्वामुळे मी त्यांना एक आदर्श पिता म्हणेन. आज मी जी काही आहे ते केवळ आणि केवळ आई - वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे. घरचे वातावरण, संस्कार यांचा खरच आपल्या आयुष्यात किती मोठा वाटा असतो ना.. त्यांनी आपल्याला काय काय दिलंय हे शब्दात सांगताच येणार नाही. असं असून सुद्धा आपल्यापैकी किती जणांनी त्यांचे आभार मानले आहेत? कोणी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून, हातात हात घेऊन फक्त "Thanks for Everything" असं म्हटलंय का? नाही तरी अजून वेळ गेलेली नाही.. खरच आपापले phones उचला, जवळ असतील तर त्यांच्याकडे जा आणि वेळ निघून जायच्या आधी सांगून टाका..
"Thanks for Everything"!!

Hi Poorva,
ReplyDeleteYou are great in expressing yourself. Keep on writing, we shall enjoy and also shall keep posting our comments.
Good to start the blog from this particular subject - you shall surely go a long way in blogging.
Smita and Vishwas
Welcome to the blogging world!! Chaan post ni suruvaat keli ahes.. :)
ReplyDeletemast
ReplyDeletechan lihila ahes.....
ekdam masta ahe kharach chan vatla vachun...
ReplyDeleteata paryant tu hushar, chan ganari ahes he mahit hota, ata hi pan quality kalali tujhi :)
very nicely written keep it up!!
chhan blog aahe PP..
ReplyDeletecontent tar chan aahech shivay
paras for for proper points and
picture selection hi masta aahe..
keep writing..
Thank you all for motivating comments!!
ReplyDeleteVery nice!!! Loved the content of the father-daughter relationship... :)
ReplyDelete